Shreya Maskar
पावसाळ्यात हॉटेल सारखी कोबी मटरची मसालेदार भाजी बनवा. झटपट होणारी रेसिपी आताच नोट करा.
कोबी मटर मसाला भाजी बनवण्यासाठी कोबी, वाटाणे, गाजर, बटाटा, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, तमालपत्र, जिरे, हळद, जिरेपूड, धणेपूड, लाल तिखट, गरम मसाला, मीठ आणि तेल इत्यादी साहित्य लागते.
कोबी मटर मसाला भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम कोबी स्वच्छ धुवून पातळी लांब कापून घ्या. त्यानंतर कुकरला हिरवे वाटाणे उकडून घ्या.
आता पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे आणि तमालपत्र घालून परता. जिरे तडतडल्यावर त्यात कोबी, गाजर, वाटाणे, बटाटा, टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या मिक्स करा.
भाजीला एक वाफ आल्यावर त्यात हळद, जिरेपूड, धणेपूड, लाल तिखट आणि मीठ घालून सर्व मिश्रण चांगले एकजीव करून घ्या.
पॅनवर झाकण ठेवा आणि भाज्या मऊ होईपर्यंत शिजवा. सर्व भाज्या शिजल्यावर गरम मसाला घाला आणि गॅस बंद करा.
अशाप्रकारे कोबी आणि वाटाण्याची भाजी तयार झाली आहे. पावसाळ्यात गरमागरम चपाती किंवा पराठ्यासोबत कोबीच्या भाजीचा आस्वाद घ्या.
कोबीमुळे पचन सुधारणे, शरीरातील दाह कमी होतो आणि हृदयाचे आरोग्य उत्तम राहते. कोबीमध्ये आवश्यक पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात, यात कॅलरीजचे प्रमाण कमी असते.