South Indian Filter Coffee Recipe : साउथ इंडियन फिल्टर कॉफी घरी बनवणं अगदी सोपं, फक्त फॉलो करा 'ही' सिक्रेट रेसिपी

Shreya Maskar

फिल्टर कॉफी

साउथ स्टाइल फिल्टर कॉफी बनवण्यासाठी कॉफी पावडर, पाणी, दूध, साखर इत्यादी साहित्य लागते. मात्र याचे प्रमाण योग्य असावे.

Filter coffee | pinterest

स्टील फिल्टर

फिल्टर कॉफी बनवण्यासाठी विशेष स्टील फिल्टर वापरला जातो, ज्यामध्ये दोन भाग असतात. वरच्या भागात दोन चमचे कॉफी पावडर टाका आणि हलके दाबा, म्हणजे कॉफी पावडर चांगली सेट होईल.

Steel filter | pinterest

कॉफी पावडर

आता फिल्टरच्या वरच्या भागात हळूहळू गरम पाणी टाका, म्हणजे कॉफी पावडर पूर्णपणे भिजते. पाणी हळूहळू तळाशी जाईल आणि छान कॉफी तयार होईल.

Coffee powder | pinterest

दूध

दुसरीकडे २ कप दूध थोडे घट्ट आणि मलाईदार होईपर्यंत गरम करा. त्यामुळे कॉफीची चव आणखी छान लागते.

milk | pinterest

साखर

आता फिल्टरमध्ये तयार झालेले मिश्रण एका कपात ओता, त्यात चवीनुसार साखर घाला आणि नंतर गरम दूध घाला. लक्षात ठेवा की दूध घालताना कॉफी हलकेच हलवा, जेणेकरून ते चांगले मिसळेल.

sugar | pinterest

कॉफी

कॉफीवर फ्रॉथ बनवण्यासाठी कॉफी एका कपातून दुसऱ्या कपमध्ये उंचावरून ओता. असे दोन-तीन वेळा केल्याने कॉफी फेसाळते.

Coffee | pinterest

साऊथ स्टाइल फिल्टर कॉफी

अशाप्रकारे साऊथ इंडियन स्टाइल पारंपरिक फिल्टर कॉफी तयार झाली आहे. पावसाळ्यात शरीराला ताजेतवाने ठेवण्यासाठी फिल्टर कॉफी नक्की प्या.

Southern Style Filter Coffee | pinterest

कॉफी अन् स्नॅक्स

फिल्टर कॉफीसोबत गरमागरम इडली, कुरकुरीत डोसा, मेदू वडा, मऊ उपमा, कांदा भजी चटपटीत लागतात.

Coffee and snacks | pinterest

NEXT : साध्या मॅगीला द्या लसणाचा तडका, रेसिपीची चव अशी की घरचे बोटं चाटत राहतील

Spicy Cheesy Maggi Recipe | AI PHOTO
येथे क्लिक करा...