Manasvi Choudhary
सायंकाळी नाश्त्याला काहीतरी झणझणीत खायचं असेल तर तुम्ही घरीच मिरचीची भजी बनवू शकता. चहासोबत मिरची भजी खायला अनेकांना आवडतात.
मिरचीची भजी घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरच्याघरी सोप्या पद्धतीने मिरचीची भजी बनवू शकता.
मिरचीची भजी बनवण्यासाठी हिरवी मिरची. बेसन, तांदळाचे पीठ, ओवा, हळद, मसाला, खाण्याचा सोडा, मीठ, तेल हे साहित्य एकत्र करा.
मिरचीची भजी बनवण्यासाठी सर्वात आधी मिरच्या स्वच्छ धुवून उभ्या चिरून घ्या.
एका बाऊलमध्ये थोडे बेसन, तांदळाचे पीठ, ओवा, हळद, लाल मसाला, मीठ हे मिश्रण एकत्र करा.
मिश्रणात थोडेसे पाणी टाका आणि मिश्रण घट्टा करा. भजीचे पीठ जास्त पातळ करू नका.
गॅसवर कढईत तेल गरम करा. एक-एक मिरची पिठात बुडवून गरम तेलात सोडा.
मिरचीची भजी दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यत कुरकुरीत तळून घ्या.