Manasvi Choudhary
स्ट्रीट स्टाईल ओली भेळ खायला सर्वानाच आवडते. ओली भेळ बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
मुरमुऱ्याची ओली भेळ बनवण्यासाठी मुरमुरे, हिरवी मिरची, चिंच गुळाची चटणी, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, कैरी, बारीक शेव, शेंगदाणे, डाळ, मीठ, पापडी, चाट मसाला हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम भेळ करण्यासाठी एका बाऊलमध्ये मुरमुरे चाळून घ्या आणि थोडे गरम करून कुरकुरीत करून घ्या.
नंतर त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो आणि उकडलेल्या बटाट्याचे तुकडे घाला.
आता या मिश्रणात तिखट हिरवी चटणी, गोड चिंच-खजुराची चटणी आणि लसूण चटणी तुमच्या चवीनुसार घाला
लिंबाचा रस, चाट मसाला आणि कोथिंबीर घाला. शेवटी डाळिंबाचे दाणे आणि भरपूर बारीक शेव टाका.
अशाप्रकारे चटपटीत ओली भेळ घरच्या घरी तयार होईल. ओली भेळ बनवल्यानंतर लगेच खावी, अन्यथा मुरमुरे मऊ पडतात.