Shreya Maskar
मिरज किल्ला हा सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात वसलेला आहे. हा एक भुईकोट (जमिनीवरील) किल्ला आहे.
मिरज किल्ला आदिलशाहीचा एक अत्यंत सुरक्षित आणि मजबूत लष्करी तळ होता. येथे मराठ्यांनी टाकलेले वेढे आणि लष्करी कोंडी यांसारख्या महत्त्वाच्या घटना घडल्या.
मिरज किल्ल्याजवळ दंडोबा हिल स्टेशन आहे. पावसाळ्यात येथे सुंदर नजारा पाहायला मिळतो. जोडीदारासोबत निवांत वेळ घालवण्यासाठी हे सुंदर लोकेशन आहे.
मिरज किल्ला आता बऱ्याच अंशी पडक्या अवस्थेत आहे. तो १० व्या शतकाच्या सुरुवातीला शिलाहार राजवटीत बांधला गेला होता आणि नंतर विजापूरच्या आदिलशाही राजवटीत त्याचा विस्तार करून त्याला अधिक मजबूत तटबंदी देण्यात आली होती.
मिरज किल्ला दक्षिण महाराष्ट्रातील एक अत्यंत मोक्याचा किल्ला होता. मिरज किल्ला आदिलशाही काळात विजापूर सल्तनतीची एक प्रमुख जहागीर आणि बळकट ठाणे होता.
सांगली शहराच्या मध्यभागी सांगली किल्ला वसलेला आहे. हा ऐतिहासिक किल्ला पटवर्धन घराण्याने बांधला होता. याच्या मध्यभागी एक सुंदर मंदिर आणि ऐतिहासिक दरबार हॉल आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.