Shreya Maskar
सकाळच्या नाश्त्यासाठी नाचणीचे अप्पे बेस्ट पर्मयाय आहे.
नाचणीचे अप्पे बनण्यासाठी उडीद डाळ, नाचणीचे पीठ, बेसन, हिरवी मिरची, लसूण, किसलेले गाजर आणि बीट्स, कोथिंबिर, धणे पावडर आणि चवीनुसार मीठ इत्यादी साहित्य लागते.
पौष्टिक नाचणीचे आप्पे बनवण्यासाठी सवप्रथम उडीत डाळ भिजवून मिक्सरमध्ये पेस्ट तयार करून घ्या.
त्यानंतर यात नाचणीचे आणि बेसन पीठ टाकून हे मिश्रण चांगले फेटून घ्या.
हे पीठ रात्रभर छान आंबवून घ्या.
सकाळी हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, आणि किसलेले गाजर, बिट घालून सर्वकाही नीट एकजीव करून घ्या.
आता आप्पे पात्राला तेल लावून त्यात हे मिश्रण मस्त एकजीव करून घ्या.
गरमा गरम आप्पे नारळाच्या चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.