Milk vs Curd: दूध की दही? रात्री झोपण्यापूर्वी कशाचे सेवन करावे, जाणून घ्या

Manasvi Choudhary

दुग्धजन्य पदार्थ

दुग्धजन्य पदार्थ आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक मानले जातात. या पदार्थ्यांमध्ये प्रथिने, कॅल्शियम आणि शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे असतात.

Milk vs Curd | pinterest

योग्य वेळी सेवन करा

निरोगी राहण्यासाठी आहारात दूध- दहीचा समावेश करतात. मात्र दूध- दही याचे सेवन योग्य वेळी करणे देखील महत्वाचे आहे.

Milk vs Curd | Freepik

रात्री दूध- दहीचे सेवन करावे की नाही?

रात्रीच्या वेळी दूध की दही, नेमके कशाचे सेवन करावे? असा प्रश्न अनेकांना पडतो.

Milk vs Curd | Freepik

रात्री झोपण्यापूर्वी दूध पिण्याचे फायदे

रात्री दुध प्यायल्याने शरीराला 'ट्रिप्टोफॅन' आणि 'मेलटोनिन' हे घटक मिळतात.मेंदू शांत होतो. आणि झोप शांत लागते.

Benefits of Milk at Night | Google

पचनक्रिया सुधारण्यास मदत होते

रात्री झोपताना कोमट दूध प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि सकाळी पोट साफ होण्यास मदत मिळते.

Improves digestion

मूड फ्रेश होतो

रात्री दूध प्यायल्याने दिवसभराचा थकवा आणि ताणतणाव दूर होतो. मूड फ्रेश होतो.

milk | pinterest

रात्री झोपण्यापूर्वी दही खावे की नाही?

आयुर्वेदामध्ये रात्रीच्या वेळी दही खाणे चुकीचे मानले जाते. दही चवीला आंबट आणि थंड असते, ज्यामुळे रात्रीच्या वेळी खाल्ल्यास कफ, सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ शकतो.

Curd

पचनक्रियेवर परिणाम होतो

रात्री शरीराची पचनक्रिया मंदावलेली असते दही हे पचायला जड असते. अशावेळी तुम्ही रात्री दहीचे सेवन केले तर पचनक्रिया बिघडू शकते.

Is Curd Good at Night?

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

next: तुम्ही खात असलेल्या मसाल्यांमध्ये भेसळ आहे का? या ५ पद्धतीने आजच तपासा नाहीतर आरोग्य येईल धोक्यात

Kitchen Spices Adulteration Test
येथे क्लिक करा...