तुम्ही खात असलेल्या मसाल्यांमध्ये भेसळ आहे का? या ५ पद्धतीने आजच तपासा नाहीतर आरोग्य येईल धोक्यात

Manasvi Choudhary

मसाले

मसाले हे रोजच्या आहारातील अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. एखाद्या पदार्थ्यांची चव वाढवण्यासाठी विविध मसाल्यांचा वापर केला जातो.

Kitchen Spices Adulteration Test

भेसळ ओळखण्याची पद्धत

पण सध्या बाजारात मिळणाऱ्या अनेक खाद्यपदार्थांत भेसळ होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये मसाल्यांचा देखील समावेश असू शकतो. यासाठी बाजारातील मसाला खरेदी करताना त्याची गुणवत्ता आणि शुद्धता तपासणे महत्त्वाचे आहे.

Kitchen Spices Adulteration Test | yandex

मसाल्यांमधील भेसळ ओळखण्याच्या टिप्स

मसाल्यांमध्ये रंग, स्टार्च किंवा इतर पदार्थांची भेसळ केली जाऊ शकते. मसाल्याची शुद्धता तपासण्यासाठी कोणत्या सोप्या पद्धती तुम्ही वापरा.

Kitchen Spices Adulteration Test

हळदीचा रंग

हळदमध्ये भेसळ करण्यासाठी मेटॅनिल यलो आणि कृत्रिम रंग वापरतात. मेटॅनिल यलो केमिकलमुळे हळदीला पिवळा रंग येतो.

Kitchen Spices Adulteration Test

मसाल्याचा रंग

मसाल्याचा रंग सुदान डाइज या केमिकलमुळे येतो. यामध्ये कृत्रिम रंग देखील मिक्स करतात.

Kitchen Spices Adulteration Test | yandex

मसाल्यांमधील भेसळ ओळखण्याची पद्धत

एका ग्लास पाण्यात एक चमचा हळद टाका आणि काही वेळ तसेच राहू द्या.

जर हळद न हलवता तशीच तळाशी बसली आणि पाण्याचा रंग हलका पिवळा झाला, तर हळद शुद्ध आहे.

मात्र, पाण्याचा रंग गडद पिवळा झाला किंवा त्यात हायड्रोक्लो्रिक ॲसिड टाकल्यावर लाल रंग आला, तर त्यात मेटॅनिल येलो या विषारी रंगाची भेसळ असण्याची शक्यता असते.

Kitchen Spices Adulteration Test | yandex

लाल तिखटाची तपासणी

एका पाण्याचा ग्लास घेऊन त्यात एक चमचा मसाला पावडर टाका.

जर मसाल्यात विटांची भुकटी किंवा लाल रंगाची माती मिसळलेली असेल, तर ती तळाशी जाऊन जमा होते.

तसेच, जर वरून कृत्रिम रंग तरंगताना दिसला तर मसाल्यामध्ये भेसळ आहे हे ओळखा.

Red chilli powder | instagram

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ल घ्या.

| Saam TV

NEXT: श्रावणात अस्सल मराठमोळा लूक करण्यासाठी ‘हे’ मंगळसूत्र ठरतील भारी; पारंपारिक मंगळसूत्राच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स!

Maharashtrian Style Traditional Mangalsutra
येथे क्लिक करा...