Manasvi Choudhary
श्रावण महिन्यात सण- उत्सवांची धामधूम सुरू असते. नागपंचमी, रक्षाबंधन, नारळीपौर्णिमा, गौरी- गणपती हे सण श्रावण असतात.
श्रावणात सणासुदीला तुम्हालाही पारंपारिक मराठमोळा लूक करायचा असेल तर त्यावर तुम्ही महाराष्ट्रीयन दागिने परिधान करावे. पारंपारिक मंगळसूत्राच्या डिझाईन्स तुम्ही पाहा.
महाराष्ट्रीयन संस्कृतीची खरी ओळख म्हणजे सोन्याच्या वाटी डिझाईनचे मंगळसूत्र. श्रावणातील सणासुदीला पैठणी किंवा नऊवारी साडीवर हे पारंपरिक डिझाईन तुम्ही निवडू शकता.
वज्रटिक हे महाराष्ट्रातील अतिशय जुन्या दागिन्यांपैकी एक मानले जाते. या ट्रेंडी आणि पारंपरिक पॅटर्नमुळे तुमच्या लूकला चारचाँद मिळेल.
अस्सल मराठमोळ्या लूकसाठी तुम्ही कोल्हापुरी साज निवडू शकता. यात वेगवेगळ्या पानांची नक्षी आणि जोंधळी मणी असतात, जे मराठमोळ्या लूकवर उठून दिसतात.
काळ्या मण्यांसोबत मोत्यांची सर आणि सोन्याचे छोटे पेंडंट असलेले मंगळसूत्र साडीवर उठून दिसते.
आंब्याची पानं किंवा पिंपळाची पानं यांसारख्या पारंपरिक डिझाईनचे मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता. जे खुप सुंदर दिसतात.