ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकजण दूध आणि दही एकत्र खातात. काही खाद्यपदार्थ बनवताना दूध आणि दह्याचा वापर एकत्रितपणे केला जातो.
आपल्या जेवणात बऱ्याचदा दह्यापासून बनलेला पनीर आणि दूधापासून बनलेली बासुंदी असे विरूद्ध आहार असतात.
आयुर्वेदानूसार, दूध आणि दही हा विरूद्ध आहार मानला जातो. म्हणजेच हे दोन पदार्थ एकत्र खाल्ल्याने आरोग्यास हानीकारक ठरू शकते.
दूध थंड गुणधर्माचं तर दही उष्ण गुणधर्माचं असतं. त्यामुळे त्यांचे एकत्र सेवन केल्याने ते शरीरात विषारी घटक तयार करू शकतात.
दूध आणि दही एकत्र खाल्ल्याने अपचन, अॅसिडिटी, पोटदुखी आणि गॅस अशा पोटाच्या समस्या होऊ शकतात.
दह्यामध्ये असलेले अॅसिड दूधातील प्रथिने पचवण्यास अडथळा आणतात. यामुळे पचनाचे कार्य मंदावते.
काहीजणांना दूध आणि दही एकत्र खाल्ल्याने त्वचेवर पुरळ किंवा लाल चट्टे येणे अशा त्वचेशी संबंधीत ऍलर्जीज होण्याची शक्यता असते.
जेवणात दही आणि दूधाचे पदार्थ खात असाल. तर दोन्ही पदार्थ खाण्याच्या वेळेत किमान दोन तासांचा वेळ हवा.