Bharat Jadhav
दिवसभर कामाच्या व्यस्तेनंतर रात्री वातावरण शांत होत असते. मध्यरात्रीनंतर पुरुष अधिक रोमँटिक किंवा भावनिक होतात.
ही फक्त एक सवय नसून शरीरातील हार्मोन्स देखील यात महत्त्वाची भूमिका बजावतात. दरम्यान मध्यरात्रीनंतर माणसाचा मूड अचानक का बदलतो हे जाणून घेऊ.
आपल्या शरीरातील हार्मोन्सची पातळीत दिवसा आणि रात्री चढ-उतार होत राहते. याला सर्कॅडियन रिदम किंवा बॉडी क्लॉक म्हणतात.
सोसायटी ऑफ एंडोक्राइनोलॉजीच्या मते, टेस्टोस्टेरॉन, एक प्रमुख पुरुष संप्रेरक, सकाळी सर्वात जास्त असतो. म्हणूनच सकाळ हा ऊर्जा आणि क्रियाकलापांचा काळ मानला जातो.
जर्नल ऑफ न्यूरोसायकोफार्माकोलॉजी (LWH) मध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, रात्री उशिरा झोपण्यापूर्वी शरीरातील गोनाडोट्रोपिन हार्मोन्स LH आणि FSH मध्ये चढ-उतार होतात, त्यामुळे मूड आणि भावनांवर परिणाम होऊ शकतो.
सकाळी टेस्टोस्टेरॉनची पातळी जास्त असते.याबाबत सोसायटी ऑफ एंडोक्राइनोलॉजीच्या अहवाल म्हणतो की, रात्रीच्या वेळी टेस्टोस्टेरॉनची पातळी पूर्णपणे कमी होत नाही. काही अभ्यासांमध्ये रात्रीच्या वेळी टेस्टोस्टेरॉनच्या पातळीत किंचित चढ-उतार आढळून आलेत. यामुळे पुरुषांमध्ये प्रेम आणि आकर्षणाची भावना जागृत होत असते.
सायन्स डायरेक्टमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, रात्र जसजशी वाढत जाते तसतसे झोप आणणारे हार्मोन मेलाटोनिन सक्रिय होतात. मेलाटोनिन शरीराला आराम देते आणि थकवा कमी करते. या दरम्यान तणाव कमी होतो आणि पुरुषांना अधिक आरामदायी वाटते. यामुळे रोमँटिक गप्पा आणि जवळीक निर्माण होऊ शकते.
मध्यरात्रीनंतरचा वेळ शांत आणि आरामदायी असतो. गोंगाट कमी असतो, कामाच्या चिंता कमी असते. त्यामुळे हे वातावरण तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवण्यासाठी अनुकूल बनते.
WHO च्या अहवालानुसार जेव्हा ताण कमी होतो तेव्हा ऑक्सिटोसिन म्हणजेच प्रेम संप्रेरकाची पातळी देखील वाढतात. हे नातेसंबंध मजबूत करण्यास मदत करतात.