Bharat Jadhav
हृदयविकाराचा झटका हा ताणतणावामुळे येत असल्याचं म्हटलं जातं. परंतु आपल्या शरीराचे जैविक घड्याळ किंवा सर्कॅडियन लय देखील यात मोठी भूमिका बजावतं असतं. शरीराचे जैविक घड्याळ दिवस आणि रात्रीच्या अनुषंगाने अवयवांचे कार्य नियंत्रित करत असते.
पहाटे २ ते ५ च्या दरम्यान हृदयाच्या कार्याची गती कमी असते. जर हृदय आधीच कमकुवत असेल, आणि त्यात रक्तप्रवाहात थोडीशी घट झाली तर हृदयावर ताण येऊ शकतो.
तर सकाळी लवकर शरीरात कॉर्टिसोल संप्रेरकाची पातळी वाढत असते. त्यामुळे रक्त घट्ट होते आणि प्लेटलेट्स एकत्र चिकटतात. यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढत असतो.
अनेकजण झोपताना घोरत असतात. यामुळे झोपेच्या वेळी श्वास घेण्यास अडथळा येतो. याला स्लीप एपनिया म्हणतात. यामुळे ऑक्सिजनची कमतरता होते आणि हृदयावर अचानक ताण येत असतो.
रात्री जड किंवा तळलेले जेवण खाल्ल्यानंतर लगेच झोप घेतली तर अॅसिड रिफ्लक्स आणि गॅस होऊ शकतो. यामुळे हृदयावर दबाव येतो. तसेच दिवसाचा ताण आणि चिंता रात्री कमी होत नाही. यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयाचे ठोके अनियमित होत असतात.
छातीत जडपणा, डाव्या हातात किंवा जबड्यात वेदना, थंड घाम, अचानक श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा रात्री चक्कर येणे अशी लक्षणे जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्यायल्याने पचन सुधारते आणि हृदयाचा ताण कमी होतो.
लसूण खाल्ल्याने कोलेस्टेरॉल कमी होतो. तसेच धमन्या स्वच्छ राहण्यास मदत होते. तुळस आणि मधाचे सेवन केल्याने रक्तातील ऑक्सिजन वाढतो आणि हृदयाचा थकवा कमी होतो.
या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. काही उपचार घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या