Sakshi Sunil Jadhav
मायक्रोवेव्ह स्वयंपाकासाठी खूप उपयुक्त असे उपकरण आहे.
मायक्रोवेव्ह हे सहज वापरता येणारे आणि जेवण गरम करण्यासाठी वापरले जाणारे सोपे उपकरण आहे.
तुम्हाला माहितीये का?मायक्रोवेव्हमध्ये काही गोष्टी गरम केल्या जाऊ शकत नाहीत.
काही गोष्टी मायक्रोवेव्हमध्ये गरम केल्याने धोका आणि नुकसान होऊ शकतं.
मायक्रोवेव्हमध्ये अॅल्युमिनियम फॉइल ठेवल्याने त्यातून आग बाहेर पडू शकते.
धातूची भांडी मायक्रोवेव्हमध्ये गरम केल्याने स्पार्किंग होऊ शकते.
प्लास्टिक कंटेनर मायक्रोवेव्हमध्ये सेफ मानलं जात नाही. कारण ते विरघळू शकतं.
अंड जर कवचासकट मायक्रोवेव्हमध्ये ठेवल्याने ते फुटू शकते.
मायक्रोवेव्हमध्ये कोणतेही पेपर आणि त्यावर खाद्यपदार्थ ठेवू नयेत. त्याने कागद आतल्या आत जळू शकतो.
द्राक्षे मायक्रोवेव्हमध्ये ठेवल्याने आतल्या आत ते फुटेल आणि मायक्रोवेव्हचे नुकसान होऊ शकते.