Manasvi Choudhary
हिवाळ्यात मेथीच्या भाजीचे सेवन शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. मेथीची भाजी उष्ण असते.
हिवाळ्यात थंडीच्या दिवसात मेथीचे सेवन केले जाते.. मेथीच्या भाजी विविध प्रकार तुम्ही घरी ट्राय करू शकता.
मेथीची झुणका भाजी ही अत्यंत चविष्ट आहे घरच्या घरी तुम्ही सोप्या पद्धतीने ही रेसिपी करू शकता.
मेथीचा झुणका बनवण्यासाठी मेथी , बेसन, जिरे, हिंग, आले, हिरवी मिरची, हळद, लाल तिखट, मसाला, मीठ, तेल हे साहित्य घ्या.
मेथीचा झुणका बनवण्यासाठी सर्वात आधी मेथी स्वच्छ सोलून ती बारीक चिरून घ्या. यानंतर मेथी स्वच्छ धुवून घ्या.
एका भांड्यात बेसन घ्या त्यात थोडेसे पाणी मिक्स करा. मिश्रणाचा गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्या.
गॅसवर एका कढईमध्ये गरम तेलामध्ये जिरे, मोहरी, हिंग याची फोडणी द्या. या फोडणीमध्ये चिरलेली मेथी, आले- मिरची पेस्ट, मसाला, हळद, मीठ हे घाला आणि मिश्रण परतून घ्या.
यामध्ये बेसनाचे पातळ मिश्रण मिक्स करा आणि संपूर्ण मिश्रण परतून घ्या भाजी घट्टसर झाल्यावर त्यावर झाकण ठेवा.
अशाप्रकारे तुमचा चविष्ट मेथीचा झुणका तयार होईल.