Shreya Maskar
मेथीची भाजी बनवण्यासाठी तेल, जिरे, लसूण, तीळ, शेंगदाणे, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची, हळद, मसाले आणि चवीनुसार मीठ इत्यादी साहित्य लागते.
मेथीची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये तेल घालून त्यात थोडे जिरे आणि लसूण घाला.
त्यात चिरलेली मेथी घालून थोडा वेळ परतून घ्या.
दुसऱ्या पॅनवर तीळ आणि शेंगदाणे भाजून मिक्सरला थोडे बारीक करून घ्या.
आता दुसऱ्या पॅनमध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची, हळद, आवडीचे मसाले आणि चवीनुसार मीठ घालून परतून घ्या.
या मिश्रणात मेथी, बारीक वाटलेले तीळ- शेंगदाणे घालून भाजी शिजवून घ्या.
मेथीच्या भाजीची चव आणखी वाढवण्यासाठी त्यात मटार देखील तुम्ही घालू शकता.
मेथीच्या भाजीचा गरमागरम पोळीसोबत आस्वाद घ्या.