Methi Thepla Recipe: घरच्या घरी सोप्या पद्धतीने मऊ मेथीचे थेपले कसे बनवायचे?

Manasvi Choudhary

मेथी थेपले

सकाळी नाश्त्यासाठी हेल्दी अन् चवीष्ट मेथीचे थेपले फायद्याचे आहे. मेथीचे थेपले बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. मेथीचे थेपले तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने बनवू शकता.

साहित्य

मेथीचे थेपले बनवण्यासाठी गव्हाचे पीठ, मेथी, दही, तेल, मीठ, हळद, मसाला, साखर, कोथिंबीर हे साहित्य एकत्र करा.

मेथी सोलून घ्या

मेथीचे थेपले बनवण्यासाठी सर्वातआधी मेथी सोलून बारीक चिरून घ्या.

Methi Leaves

साहित्य मिक्स करा

एका मोठ्या भांड्यात गव्हाचे पीठ, बारीक चिरलेली मेथी, दही, मीठ , हळद, मसाला , साखर हे मिक्स करा

Methi Thepla Recipe

कणिक मळून घ्या

सर्व साहित्य चांगले एकत्र करून त्याचे कणिक मळून घ्या. पीठ घट्ट मळल्यानंतर बाजूला ठेवा.

Methi Thepla Recipe

थेपले लाटून घ्या

यानंतर पिठाचे बारीक बारीक गोळे बनवा आणि पोलपाटवर पीठाचा गोळा लाटून घ्या.

Methi Thepla Recipe

थेपले तयार होतील

गॅसवर पॅनवर गरम तेलामध्ये हे थेपले तुम्ही दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग होईपर्यंत भाजून घ्या. अशाप्रकारे तयार थेपले तुम्ही दही आणि लोणच्यासोबत सर्व्ह करा.

Methi Thepla Recipe

next: Amla Chutney Recipe: तोंडाची चव वाढवणारी आंबट- गोड आवळा चटणी कशी बनवायची?

येथे क्लिक करा..