Methi Ladoo: मेथीचा पौष्टिक लाडू कसा बनवाल? 'ही' ट्रिक वापरा, कडवटपणा होईल दूर

Siddhi Hande

मेथीचा लाडू

 मेथीचा लाडू म्हटल्यावर अनेकजण नाक मुरडतात. परंतु मेथीचा लाडू हा खूप पौष्टिक असतो.

Methi Ladoo | Saam TV

मेथीची पावडर

मेथीचा लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी अर्धा कप मेथीचे दाणे मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या.

Methi Ladoo | yandex

मेथीत दूध टाका

यानंतर मेथीची पावडर वाटीत काढा. त्यात दूध टाका.

Methi Ladoo | Google

ड्रायफ्रुट्स भाजून घ्या

यानंतर कढईत तूप टाका. त्यात बदाम, काजू, पिस्ता, अक्रोड हे सर्व तळून घ्या. यानंतर तेलाच डिंग तळून घ्या.

Methi Ladoo | Google

नारळाचा किस

यानंतर सुक्या नारळाचा किस याच तूपात भाजून घ्या. खोबऱ्याचा किस छान भाजल्यानंतर ताटात काढून घ्या. तूपात गव्हाचे पीठ भाजून घ्या.

Methi Ladoo | Google

ड्रायफ्रुट्स

यानंतर सर्व ड्रायफ्रुट्स, डिंक याची पावडर बारीक करुन घ्या.

Methi Ladoo | Google

मेथीच्या दाण्याची पेस्ट

यानंतर तव्यावर १ चमचा तूप गरम करा त्यात मेथीच्या दाण्याची पेस्ट टाका. त्यातील मॉइश्चर निघेपर्यंत छान भाजून घ्या. ही मेथी मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या.

Methi Ladoo | yandex

मेथीची पेस्ट

यानंतर गव्हाच्या पीठात मेथीची पेस्ट टाका. ती छान मिक्स करा. त्यात ड्रायफ्रुट्स पावडर टाका.

Methi Ladoo | Google

गुळाचा पाक

यानंतर कढईत गुळाचा पाक करुन घ्या. त्यात हे सर्व मिश्रण टाकून एकजीव करा. यानंतर मिश्रणाचे लाडू वळून घ्या.

Methi Ladoo | Google

Next: हृता दुर्गुळेचं खरं नाव काय?

Hruta Durgule | Instagram
येथे क्लिक करा