Ruchika Jadhav
मेथीचे लाडू आपल्या आरोग्यासाठी फार पौष्टीक असतात. हे लाडू बनवणे जास्त कठीण नाही अगदी सोपं आहे.
यासाठी काय साहित्य लागते ते आधी जाणून घेऊ. मेथी लाडू बनवण्यासाठी मेथी दाणे, दूळ, खोबरं, खारका, दूध आणि ड्रायफ्रूट्स असे साहित्य लागते.
सर्वात आधी मेथी भाजून घ्या आणि बारीक दळून आणा. त्यानंतर ही मेथी दूधात रात्रभर भिजत ठेवा. तसेच सकाळी तुपात भाजून घ्या.
ड्रायफ्रूट्समध्ये तुम्ही काजू, बदाम आणि अन्य विविध ड्रायफ्रूट्स बारीक कापून तुपात फ्राय करून घ्या.
या लाडूमध्ये किसलेलं खोबरं सुद्धा टाकलं जातं. खोबरं बारीक किसून मस्त भाजून घ्या.
त्यानंतर शेवटी गुळाचा पाक बनवून घ्या. गुळाचा पाक बनवून यामध्ये सर्व मिश्रण मिक्स करत त्याचे सुंदर लाडू बनवून घ्या.
अशा पद्धतीने तयार झाले मेथीचे सुंदर गोल आणि कमी कडू असलेले पौष्टीक लाडू.