Methi Ladoo : हिवाळ्यात रोज खा १ मेथीचा लाडू; आजारांपासून रहाल दूर, वाचा आजीची सिक्रेट रेसिपी

Shreya Maskar

हिवाळा

हिवाळ्यात मेथीचे लाडू आरोग्यास खूप फायदेशीर ठरतात. मेथीमध्ये फायबर आणि काही महत्त्वाचे पोषक घटक असतात. गूळ, तूप आणि सुका मेवा यांमुळे शरीराला ऊर्जा मिळते.

Winter | pinterest

मेथीचे लाडू

मेथीचे लाडू बनवण्यासाठी मेथी दाणे, गव्हाचे पीठ, गूळ, साजूक तूप, खाण्याचा डिंक, सुके खोबरे, बदाम, काजू, खसखस, सुंठ पावडर , वेलची पूड , जायफळ पूड इत्यादी साहित्य लागते.

Methi Ladoo | pinterest

मेथी दाणे

सर्वप्रथम मेथी दाणे स्वच्छ करून त्यांची मिक्सरमध्ये बारीक पूड करा. मेथीचा कडवटपणा कमी करण्यासाठी ही पूड थोड्या दुधात भिजवून काही तास किंवा रात्रभर ठेवा. नंतर ती मंद आचेवर चांगली वाळेपर्यंत परतून घ्या.

Fenugreek Seeds | pinterest

डिंक

कढईत थोडे तूप गरम करून त्यात डिंक घाला. मंद आचेवर डिंक फुलून कुरकुरीत होईपर्यंत तळा. थंड झाल्यानंतर त्याची बारीक पूड करा.

Methi Ladoo Recipe | pinterest

गव्हाचे पीठ

आता त्याच कढईत उरलेले तूप घालून गव्हाचे पीठ मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत भाजा. पीठाचा छान सुगंध येईपर्यंत सतत हलवत राहा.

Whole Wheat Flour | pinterest

सुकामेवा

बदाम, काजू आणि सुके खोबरे बारीक चिरून घ्या. थोड्या तुपात हे सर्व साहित्य हलके भाजून घ्या. खसखसही स्वतंत्रपणे भाजून घ्या.

Dry Fruits | pinterest

वेलची पूड

भाजलेल्या गव्हाच्या पिठात मेथीची पूड, डिंकाची पूड, सुका मेवा, खसखस, सुंठ पावडर, वेलची पूड आणि जायफळ पूड घाला. सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करा.

Cardamom powder | pinterest

गूळ मिसळून लाडू वळा

गूळ बारीक किसून घ्या. मिश्रण थोडे कोमट असताना त्यात गूळ मिसळा. गुळाच्या उष्णतेमुळे तो वितळून मिश्रण एकत्र येण्यास मदत होते. आवश्यक असल्यास थोडे कोमट तूप घाला. मिश्रण हाताला सहन होईल इतके कोमट असताना लाडू वळा.

jaggery | pinterest

मेथीचे लाडू किती दिवस टिकतात?

लाडू पूर्ण थंड झाल्यानंतर स्वच्छ आणि कोरड्या हवाबंद डब्यात ठेवा. ओलावा आणि उष्णतेपासून दूर ठेवल्यास ते साधारण २–३ आठवडे चांगले राहू शकतात.

fenugreek laddus | pinterest

NEXT : थंडीत जेवणाची रंगत वाढवेल कोकण स्पेशल तिळाची चटणी, गरमागरम भाकरीसोबत खाण्याची मजा काही औरच

Konkani Tilachi Chutney Recipe | AI PHOTO
येथे क्लिक करा...