Ruchika Jadhav
मेथी पुलाव असा पदार्थ आरे जो प्रत्येक व्यक्तीला आवडेल. घरामध्ये पाहुणे आल्यावर किंवा लहान मुलांसाठी देखील तुम्ही हा पुलाव बनवू शकता.
मेथीची भाजी असलेला पुलाव नेमका कसा बनवतात? त्यात काय काय साहित्य टाकावे लागते याचीच माहिती आज जाणून घेणार आहोत.
पुलाव करताना सर्वात आधी तुम्हाला मेथीची भाजी बनवावी लागेल.
भाजी बनवण्यासाठी तुम्ही फक्त मोठी पाने असलेली नाही तर लहान पानं असलेली मेथी देखील वापरू शकता.
मेथीची भाजी बनवताना यामध्ये तेल, कांदा, जिरे, मोहरी आणि कढिपत्ता यासह मुग डाळीची मस्त फोडणी द्या.
भाजी बनवताना यात मेथीची पाने टाकल्यावर लक्ष ठेवा आणि लगेचच यात तांदूध देखील मिक्स करा.
पुढे भाजीसाठी पॅनमध्ये पाणी टाकले असेल तर याच पाण्यात भाजी मस्त शिजवून घ्या.