Manasvi Choudhary
मेथीला इंग्रजीमध्ये Fenugreek असे म्हटले जाते. मेथी ही हा अनेकांच्या आवडीची भाजी आहे. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच मेथी भाजी आवडते. मेथीच्या भाजीच्या तुम्ही विविध रेसिपी ट्राय करू शकता.
मेथीची सुक्की भाजी तुम्ही करू शकता कांदा- लसूण टाकून केलेली मेथीची भाजी चविष्ट लागते.
मेथीची भजी हा एक चटपटीत प्रसिद्ध पदार्थ आहे. तुम्हाला कांदा, बटाटा भजी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही मेथीची भजी बनवू शकता.
बेसन आणि मेथी मिक्स करून तुम्ही मेथीचे पीठलं बनवू शकता. भाकरीसोबत मेथीचे पीठलं चवीला भारीच लागते.
मेथीची भाजी घालून तुम्ही मेथीचा पुलाव देखील बनवू शकता मेथीचा पुलाव बनवणयाची रेसिपी सोपी आहे.
मेथीची भाजी आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने तुम्ही वरील सर्व रेसिपी आहारात ट्राय करू शकता.