Shreya Maskar
पीरियड्स दरम्यान होणारे वजन वाढणे हे प्रामुख्याने हार्मोनल बदल आणि वॉटर रिटेंशनमुळे असते, जे तात्पुरते असते. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. मिठाचे आणि साखरेचे प्रमाण कमी करा.
मासिक पाळीच्या काळात हार्मोन्समध्ये वेगाने बदल होतात. एस्ट्रोजनची पातळी वाढते, ज्यामुळे शरीर फुगलेले दिसते. थोडे वजन देखील वाढते.
हार्मोनल बदलांमुळे भूक वाढू किंवा खाण्याची तीव्र इच्छा निर्माण होते. ज्यामुळे आपण जास्त खातो. ज्याचा थेट परिणाम वजनावर होतो. मासिक पाळी दरम्यान वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच पीरियड्स आले नसल्यामुळे थोडे वजन वाढले असेल तर हे उपाय आताच करा.
वजन वाढू नये म्हणून फायबरयुक्त आहार घ्या. ज्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होईल. फायबरच्या पचनामुळे शरीरातील चरबी विरघळते आणि चयापचय क्रिया निरोगी राहते.
मासिक पाळीच्या काळात भरपूर पाणी प्या. आपले शरीर हायड्रेटेड ठेवा. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते.
पीरियड्स येण्याआधी किंवा पीरियड्समध्ये खाण्याची तीव्र इच्छा होते. मानसिक भावनांमध्ये चढउतार होतात. खाण्याची तीव्र इच्छा होते. तुम्ही जर वारंवार खाल्लात तर व्यायाम केल्यामुळे नियंत्रणात राहिलेले वजन वाढू लागेल. त्यामुळे, आपले मन शांत ठेवा.
कॅफीन शरीरातील पाणी कमी करते. अतिसेवनाचा वजनावरही परिणाम होतो. आपले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी चहा आणि कॉफीचे सेवन नियंत्रित करणे उत्तम आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.