Tips For Picnic In Periods : पीरियड्समध्ये पिकनिकला जाताय? बॅगमध्ये 'या' ५ गोष्टी ठेवा, राहाल टेन्शन फ्री

Shreya Maskar

पीरियड्समध्ये ट्रिप

तुम्ही जर पीरियड्समध्ये ट्रिप प्लान करत असाल तर तुमच्या बॅगमध्ये काही गोष्टी असायलाच हव्या, जेणेकरून तुमची ट्रिप खूप सुखकर होईल आणि तुम्हाला मजा-मस्ती करता येईल.

Trips During Periods | pinterest

पीरियड्स

पीरियड्समध्ये पिकनिक प्लान करत असाल तर पॅड्स, टॅम्पॉन्स, पीरियड अंडरवेअर तुमच्याकडे असायलाच हवे. चांगल्या दर्जाचे आणि जास्त प्रमाणात या वस्तू तुमच्याकडे ठेवा. उष्णतेमध्ये किंवा शारीरिक हालचालीनंतर तुम्हाला पॅड्स अधिक वेळा बदलावे लागू शकतात.

Period Essentials | pinterest

औषधे

पीरियड्समध्ये काही महिलांना अनेक वेदना होतात. उदा, पाठदुखी, पोटदुखी, कंबर दुःखी, पाय दुखतात, डोके दुखते अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतली जाणारी औषधे तुमच्याकडे ठेवा.

Medication | yandex

गोड पदार्थ

पीरियड्समध्ये हार्मोनल बदलामुळे तुम्हाला गोड खाण्याची इच्छा होते. त्यामुळे सोबत चॉकलेट किंवा तुमचा आवडीचे गोड पदार्थ सोबत ठेवा. तसेच गोड खाल्ल्याने तुम्हाला चक्कर येणार नाही आणि अस्वस्थ वाटणार नाही.

Sweet Treats | yandex

छंद जोपसणारी वस्तू

पीरियड्समध्ये हार्मोनल बदलामुळे मूड स्विंग होतात. अशावेळी स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी आपली आवडती वस्तू सोबत ठेवा. प्रवासात छंद जोपासा. जर तुम्हाला गीतार वाजवायला आवड असेल तर ती आपल्या सोबत ठेवा.

Hobbies | yandex

स्वच्छतेकडे विशेष लक्ष

प्रवास म्हटले की स्वच्छता आलीच पण जर तुम्ही पीरियड्समध्ये ट्रिपवर जात असाल तर विशेष स्वच्छता बाळगा. यात हँड सॅनिटायझर, वेट वाइप्स आणि टॉयलेट पेपर कायम सोबत ठेवा.

Hygiene | yandex

झिप लॉक पिशवी

झिप लॉक पिशवी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. पीरियड्समध्ये वापरलेल्या उत्पादने झिप लॉक पिशवीमध्ये ठेवा. प्रवासात असेल कुठेही काही फेकू नका. याचा तुम्हाला आणि इतरांना, प्राण्यांना-पक्षांना त्रास होऊ शकतो.

Zip-Lock Bags | yandex

कपडे

मासिक पाळीत घट्ट कपडे घालणे टाळा. कायम आरामदायक, सैल कपड्यांची निवडा करा. तसेच गडद रंगाचे कपडे निवडा. सोबत जास्तीचे रूमाल ठेवा. तसेच एक जोड जास्तीचा ठेवा.

Clothing | yandex

NEXT : पीरियड्समध्ये करा 'हा' एकच रामबाण उपाय, त्वचेवर खाज अन् पुरळ येणारच नाही

Period Care Tips | pinterest
येथे क्लिक करा...