Travelling During Periods : ट्रॅव्हलिंग करताना पीरियड्स आले? घाबरू नका; 'या' ५ स्मार्ट टिप्सने प्रवास होईल आरामदायी

Shreya Maskar

ट्रॅव्हलिंगमध्ये पीरियड्स आले

प्रवासात असताना अचानक तुम्हाला मासिक पाळी आल्यास घाबरू नका. प्रवासात गाडी थांबवून एक चांगले वॉशरूम शोधा. त्वरित मेडिकल स्टोरमधून आवश्यक वस्तू खरेदी करा. उदा. पॅड्स, टॅम्पॉन्स

Period | pinterest

पीरियड्स किट

तुम्ही जर मासिक पाळीच्या तारखेच्या दरम्यान तुमची ट्रिप प्लान करत असाल तर सोबत पीरियड्स किट ठेवा. जेणेकरून तुम्हाला त्या क्षणी धावावे लागणार नाही आणि तुमच्याकडे सर्व आवश्यक गोष्टी असतील.

Period Kit | pinterest

आवश्यक गोष्टी

पीरियड्स किटमध्ये पॅड्स, टॅम्पॉन्ससोबत इंटिमेट वाइप्स, हँड सॅनिटायझर, छोट्या झिप-लॉक बॅग्स सोबत ठेवा. जेणेकरून तुम्हाला कोणती अडचण येणार नाही.

Essential Items | pinterest

मेडिकल किट

पीरियड्समध्ये असहाय वेदना होतात, अशावेळी प्रवास करणे खूप कठीण जाते. असे होऊ नये म्हणून पोट, पाठ दुखीचे औषध कायम सोबत घ्या. पीरियड क्रॅम्प्स कमी होतील. तसेच सोबत इलेक्ट्रिक हॉट वॉटर बॅग ठेवा.

Medical Kit | pinterest

कपडे

मासिक पाळी दरम्यान सैल कपडे परिधान करावे. अंगाला घट्ट बसणारे कपडे शक्यतो टाळा. जेणेकरून तुम्हाला आरामदायी वातावरण मिळेल. तुम्ही हलके, गडद रंगाचे कपडे निवडा. जसे की हवेशीर ड्रेस किंवा सैल पॅन्ट. सोबत पीरियड अंडरवियर ठेवा.

Clothing | pinterest

गोड पदार्थ

मासिक पाळी दरम्यान शरीरातील हार्मोनल बदलावामुळे थकवा जाणवतो, चक्कर येते, चिडचिड होते अशावेळी खाण्यासाठी चॉकलेट किंवा गोड पदार्थ सोबत ठेवा. जे तुम्हाला आनंदी ठेवतील.

Sweets | pinterest

महत्त्वाची टिप १

सार्वजनिक शौचालये वापरताना स्वच्छतेची काळजी घ्या. टॉयलेट सीट सॅनिटायझर वापरा. जास्त वेळ एकाच जागी बसून न राहता थोडा वेळ चालणे किंवा स्ट्रेचिंग करणे फायदेशीर ठरते. तसेच बाहेरचे तळलेले पदार्थ टाळा.

Important Tip 1 | pinterest

महत्त्वाची टिप २

शक्य असल्यास पीरियड्सच्या तारखेच्या आसपास ट्रिप प्लान करू नये. कारण सोयी सुविधांच्या अभावामुळे तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागेल. तसेच बाहेर स्वच्छतेचा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतो.

Important Tip 2 | pinterest

NEXT : पीरियड्समधील वेदना शून्य मिनिटांत होतील कमी; 'हे' ५ आयुर्वेदिक उपाय ठरतील फायदेशीर

Period Cramps Remedies | saam tv
येथे क्लिक करा...