Period Cramps Remedies : पीरियड्समधील वेदना शून्य मिनिटांत होतील कमी; 'हे' ५ आयुर्वेदिक उपाय ठरतील फायदेशीर

Shreya Maskar

मासिक पाळी

पीरियड्स दरम्यान अनेक महिलांना असाह्य वेदना होतात. पाठ, पोट , पाय दुखतात अशा वेळी घरगुती उपायांनी काही फरक पडत नसेल तर हे आयुर्वेदिक उपाय तुम्हाला मिनिटांत आराम देतील.

Menstruation | pinterest

आयुर्वेद

आयुर्वेदात आले हे वेदनाशामक मानले जाते. जे शरीरातील 'प्रोस्टाग्लँडिन्स'ची पातळी कमी करते आणि मासिक पाळीच्या काळात जाणवणारा थकवा दूर करते.

Ayurveda | pinterest

आले- काळी मिरीचा चहा

आले, काळी मिरी आणि मध यांचा वापर करून गुणकारी असा हर्बल चहा तयार करा. हा चहा प्यायल्याने पीरियड्स दरम्यानच्या वेदना कमी होतात.

Ginger & Black Pepper Tea | pinterest

ओवा

जिरे आणि ओवा हे मासिक पाळीतील पेटके आणि वेदना कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. त्यांच्यामध्ये दाह-शामक गुणधर्म देखील असतात, ज्यामुळे वेदना कमी होतात.

Ajwain | pinterest

हळद -जायफळ

वेदनाशामक आयुर्वेदिक नैसर्गिक उपायांमध्ये हळद ही सर्वात प्रभावी मानली जाते. हळदीचा वापर अन्नामध्ये करता येतो किंवा कोमट दुधासोबतही तिचे सेवन करता येते. जायफळ शरीरातील उष्णता (ऊब) टिकवून ठेवण्यास आणि स्नायूंच्या वेदना कमी करण्यास मदत करते.

Turmeric & Nutmeg | pinterest

गरम तेलाने मालिश

पोटाच्या खालच्या भागाला आणि पाठीच्या खालच्या भागाला कोमट तीळाच्या तेलाने मालिश केल्याने पीरियड्समध्ये होणाऱ्या वेदना कमी होण्यास मदत मिळते.

Hot Oil Massage | pinterest

सैंधव मीठ

एका कप पाण्यात अर्धा चमचा अजमोद उकळून, त्यात थोडे सैंधव मीठ घालून ते पाणी प्यायल्याने पोटात येणाऱ्या पेटके आणि वेदनांपासून मोठा आराम मिळतो.

Salt | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

disclaimer | pinterest

NEXT : पीरियड्समध्ये पिकनिकला जाताय? बॅगमध्ये 'या' ५ गोष्टी ठेवा, राहाल टेन्शन फ्री

Tips For Picnic In Periods | pinterest
येथे क्लिक करा...