Shreya Maskar
काही महिलांना मासिक पाळीच्या काळात पाठीचे दुखणे वाढते. ज्यामुळे त्यांना कामे करतानाही त्रास होतो. पीरियड्समध्ये ही वेदना खूप त्रासदायक असू शकते.
तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने कंबर आणि पाठ दुखीवर औषधे घेऊ शकता. औषधांमुळे सूज कमी होते आणि वेदना कमी करण्यास मदत मिळते.
निरोगी राहण्यासाठी नियमित शारीरिक हालचाल करणे आवश्यक आहे. शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहिल्याने अनेक समस्या कमी होण्यास मदत मिळतात. कंबरदुखी ही त्यापैकीच एक समस्या आहे.
कंबरदुखी आणि पाठदुखी कमी करण्यासाठी तुम्ही हलके स्ट्रेचिंग आणि योगा करा. या हालचालींमुळे रक्ताभिसरण सुधारून वेदना कमी होतात. तसेच शरीराला आराम मिळतो.
कंबर आणि पाठीला बर्फाचा शेक द्या. यामुळे ताणलेले स्नायू शिथिल होण्यास आणि वेदना कमी होण्यास मदत होते. तुम्हाला चालताना त्रास होणार नाही.
हीटिंग पॅड्स,गरम पाण्याची बाटली वापरून तुम्ही कंबर आणि पाठीला शेक द्या. तसेच कोमट पाण्याने अंघोळ करू शकता.
भावनिक तणावामुळे मासिक पाळीतील पाठदुखी अधिक तीव्र होऊ शकते. त्यामुळे तणाव कमी घ्या, आनंदी राहा. तुमचे छंद जोपासा.
मासिक पाळीच्या काळात तुम्ही दीर्घ श्वास घेणे, ध्यान करणे, योगा करणे खूप फायदेशीर ठरू शकते. यामुळे स्नायूंचा ताण कमी होण्यास मदत होते.
आहारात ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि मॅग्नेशियमने समृद्ध असलेल्या पदार्थांचा समावेश केल्याने सूज आणि स्नायूंचे पेटके कमी होण्यास मदत होते.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.