Menstrual Leg Cramps Remedies : मासिक पाळीमध्ये पाय प्रचंड दुखतात, फक्त १० मिनिटे करा 'हा' सोपा उपाय, वेदना होतील कमी

Shreya Maskar

गरम पाण्याची शेक

गरम पाण्याची शेक हा पाळीच्या वेदनांवर रामबाण उपाय आहे. पायांवर किंवा मांडीवर गरम पाण्याची बॉटल किंवा हीटिंग पॅड ठेवल्यास स्नायू सैल होतात आणि वेदना कमी होतात.

Hot Water Compress | yandex

हलका व्यायाम

पीरियड्समध्ये पायांचे दुखणे वाढते, त्यामुळे तुम्ही नियमित पायांचे हलके व्यायाम करा. चालणे, योगासने (जसे की पाय स्ट्रेच करणे) केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि cramps कमी होतात. रोज १० मिनिटे चाला.

Exercise | yandex

गरम पाण्याने अंघोळ

गरम पाण्याने आंघोळ केल्याने संपूर्ण शरीर रिलॅक्स होते आणि पायातील ताण कमी होतो. तसेच तुम्हाला फ्रेश वाटते.

Hot Bath | yandex

हर्बल चहा

मासिक पाळीत मसाल्याचा चहा पिणे टाळा. त्याऐवजी आल्याचा किंवा दालचिनीचा चहा प्या. पायाची सूज कमी होते आणि वेदना कमी होण्यास मदत मिळते.

Herbal Tea | yandex

पोषक आहार

मासिक पाळीत महिलांना अधिक ताकदीची गरज असते. त्यामुळे कॅल्शियम आणि मॅग्नेशियमयुक्त आहार घ्या. दूध, बदाम, केळी यांसारखे पदार्थ खाल्ल्यास स्नायूंचा ताण कमी होतो.

Diet | yandex

तेलाने मालिश

नारळ तेल किंवा तिळाच्या तेलाने पायांना हलक्या हाताने मालिश केल्यास रक्तप्रवाह वाढतो आणि आराम मिळतो.

Oil Massage | yandex

भरपूर पाणी प्या

शरीरात पाण्याची कमतरता असल्यास cramps वाढू शकतात. त्यामुळे दिवसातून पुरेसे पाणी प्या.मेथी किंवा जिऱ्याचे पाणी पिल्यास शरीरातील सूज आणि वेदना कमी होतात.

Water | yandex

विश्रांती घ्या

पुरेशी झोप आणि आराम घेतल्याने शरीर लवकर रिकव्हर होते. वेदना खूप तीव्र असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Get Rest | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Menstrual Leg Cramps Remedies | yandex

NEXT : कुरळ्या केसांची घरीच करा 'अशी' स्ट्रेटनिंग, सर्वजण विचारतील रेशमी केसांचे रहस्य

Tips To Straighten Curly Hair | saam tv
येथे क्लिक करा...