पीरियड्सच्या दिवसात थंड पाणी प्यावं की गरम? काय म्हणतात डॉक्टर्स?

Bharat Jadhav

थंड पाणी प्यावे की नाही?

मासिक पाळीच्या काळात थंड पदार्थ किंवा पेये न घेण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो. आजींकडून चालत आलेले असे अनेक पारंपरिक उपाय भारतात आजही पाळले जातात. यातील काही उपाय योग्य असतात. तर काही केवळ गैरसमज असतात. मासिक पाळीदरम्यान थंड पाणी प्यावे की नाही, हा असाच एक प्रश्न आहे.

समज की गैरसमज

अनेक महिलांचा असा समज आहे की, थंड पाणी किंवा इतर थंड पदार्थ सेवन केल्याने रक्तप्रवाहावर परिणाम होतो. पण हे खरंच सत्य आहे की हा केवळ एक समज आहे?

डॉक्टर्स काय म्हणतात?

मासिक पाळीच्या काळात महिलांनी आपल्या आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. काही विशिष्ट पदार्थांमुळे वेदना वाढू शकतात किंवा इतर समस्या उद्भवू शकतात. या काळात थंड पाणी पिणे योग्य आहे की नाही, हे या लेखात तज्ज्ञांकडून जाणून घेऊ.

वैज्ञानिक पुरावा नाहीये

डॉ. मानिनी पटेल वरिष्ठ सल्लागार, प्रसूती आणि स्त्रीरोगशास्त्र, अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल, जयपूर) यांच्यानुसार मासिक पाळीदरम्यान थंड पाणी प्यायल्याने पाळी थांबते किंवा वेदना वाढतात, हा एक गैरसमज आहे. याला पुष्टी देणारा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाहीये.

हार्मोनल बदलांमुळे वेदना

मासिक पाळीतील वेदना शरीरातील हार्मोनल बदलांमुळे आणि गर्भाशयाच्या स्नायूंच्या आकुंचनामुळे होतात. या प्रक्रियेत प्रोस्टाग्लँडिन नावाचा एक हार्मोन भूमिका बजावतो. तो गर्भाशयाचे आकुंचन वाढवून वेदना निर्माण करू शकतो.

शरीरात पाण्याची पातळी योग्य राखा

तज्ञांच्या मते, मासिक पाळीच्या काळात शरीरात पाण्याची पातळी योग्य राखली पाहिजे. पुरेसे पाणी प्यायल्याने शरीरातील पाण्याची कमतरता टाळता येते. थकवा, अशक्तपणा व डोकेदुखी यांसारख्या समस्या कमी होण्यास मदत होते.

कोमट पाणी प्या

प्रत्येक स्त्रीचे शरीर वेगळे असते. काही स्त्रियांना थंड पाणी प्यायल्यानंतर पोटात जडपणा, पोट फुगल्यासारखे वाटते. काहींना सौम्य अस्वस्थता जाणवत असते. अशावेळी त्या कोमट पाणी पिणे पसंत करू शकतात.

डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

मासिक पाळीच्या काळात शरीराला विश्रांती देणे, सकस आहार घेणे आणि भरपूर पाणी पिणे या गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत. जर वेदना तीव्र असतील, अतिरक्तस्राव होत असेल किंवा मासिक पाळीशी संबंधित समस्या वारंवार उद्भवत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

हेही वाचा

येथे क्लिक करा

IVF उपचार घेण्याच्या विचारात आहात? कोणत्या टेस्ट होतात, किती येतो खर्च ?