ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेक लोक दाढी केल्यानंतर चेहऱ्यावर जळजळ होणे, खाज सुटणे किंवा पुरळ येणे अशा समस्या होतात.
शेव्हिंग केल्यानंतर गुळगुळीत त्वचेसाठी या टिप्स नक्की फॉलो करा.
शेव्हिंग करताना रेझरचा वापर हळूहळू करा. घाईघाईत शेव्हिंग केल्याने देखील त्वचा लाल होऊ शकते.
शेव्हिंग करण्याआधी चेहरा गरम पाण्याने धुवा. यामुळे दाढीचे केस नरम होतात. आणि दाढी करणे सोपे होते.
दाढी करताना केसांच्या वाढीच्या दिशेने दाढी करा. उलटा रेझर वापरु नका. यामुळे ब्लेड लागून रक्त येऊ शकतो.
दाढी केल्यानंतर त्वचेची जळजळ थांबवण्यासाठी कोरफडीचे जेल वापरा.