Medu Vada Recipe: बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ; नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा परफेक्ट मेदू वडा, वाचा रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य

उडीद डाळ १ कप, हिरव्या मिरच्या २, आलं १ इंच, कढीपत्ता, कोथिंबीर, जिरे १ टीस्पून, काळी मिरी, मीठ, तांदळाचे पीठ (ऐच्छिक), तळण्यासाठी तेल.

bread medu vada recipe

डाळ भिजवून वाटून घ्या

उडीद डाळ ४–५ तास भिजवा. पाणी काढून कमी पाणी वापरत घट्ट आणि फुललेले पीठ वाटून घ्या.

Medu Vada recipe | google

मसाले मिसळा

वाटलेल्या पिठात बारीक चिरलेली हिरवी मिरची, आलं, कढीपत्ता, कोथिंबीर, जिरे, काळी मिरी आणि मीठ घालून चांगले एकजीव करा.

Medu Vada Recipe | yandex

पीठ हलके फेटा

मेदू वडा मऊ होण्यासाठी पीठ ४–५ मिनिटे एका दिशेने फेटा. यामुळे पिठात हवा मिसळून वडा हलका आणि स्पंजी होतो.

Medu Vada Recipe

वड्यांना आकार द्या

हाताला थोडे पाणी लावून पिठाचा गोळा घ्या. मधोमध छिद्र करून पारंपरिक मेदू वड्याचा आकार तयार करा.

Medu Vada Recipe | yandex

सोनेरी होईपर्यंत तळा

कढईतील मध्यम गरम तेलात वडे सोडा. दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.

medu vada recipe | yandex

गरमागरम सर्व्ह करा

तयार मेदू वडा नारळाची चटणी, सांबार किंवा टोमॅटो चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा. नाश्ता, ब्रंच किंवा पाहुणचारासाठी हा उत्तम पदार्थ आहे.

Medu Vada Recipe | SaamTV

Chandrasana Benefits: मानसिक तनाव फार वाढलाय? मग रोज सकाळी १० मिनिटं करा हे एक योगासन, आठवड्याभरात दिसेल फरक

Chandrasana Benefits | saam Tv
येथे क्लिक करा