Shraddha Thik
मानसिक समस्या कमी करण्यासाठी ध्यान हा एक उत्तम मार्ग आहे. याचा समावेश आपल्या जीवनशैलीत केला तर अनेक मानसिक समस्या दूर होऊ शकतात.
आजच्या व्यस्त जीवनात ध्यानाची विशेष गरज आहे. यामुळे मेंदूला आराम तर मिळतोच पण मनालाही शांतता मिळते.
ध्यानामुळे तणाव कमी होण्यास मदत होते.
ध्यानामुळे चिंता कमी होण्यास आणि दूर करण्यास मदत करते.
ध्यान केल्याने एकाग्रता वाढते.
ध्यान केल्याने तुम्ही नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवू शकता.
तुम्ही सुरूवातीला 10 मिनिटांसाठी ध्यान सुरू करू शकता. यानंतर, जसजसे दिवस वाढत जातील तसतसे तुम्ही त्याची वेळ वाढवावी. किमान 20 मिनिटे ध्यान करणे योग्य मानले जाते.