Ruchika Jadhav
मासिक पाळी दरम्यान, अनेक मुलींना पोटात आणि कंबरेत फार जास्त वेदना होतात.
अशावेळी मुलींनी खाण्यापिण्याच्या सवयींसह अन्य गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. मात्र यात त्यांच्याकडून काही चुका होतात.
मासिकपाळी दरम्यान महिलांनी योग्य इनरवेअर घातले पाहिजेत. चुकीच्या इनरवेअरमुळे सुद्धा त्रास वाढतो.
काही मुली सतत पॅड बदलण्याचा कंटाळा करतात किंवा त्यांना कामामुळे यासाठी वेळ नसतो. मात्र याने आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते.
काही मुली आपल्या बॅगमध्ये एक्सट्रा सॅनिटरी नॅपकीन घेऊन ठेवतात. हे वापरण्याआधी त्याची एक्सपायरी डेट तपासली पाहिजे.
जर तुम्ही एक्सपयरी डेट संपलेलं पॅड वापरलं तर तुम्हाला यामुळे स्किनशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.