Alisha Khedekar
बाथरूममधील ओलावा आणि वाफेमुळे औषधांची गुणवत्ता खराब होऊ शकते. त्यामुळे औषधे कोरड्या जागीच ठेवणे योग्य.
फ्रिजच्या वर उष्णता निर्माण होते. तापमानातील बदलांमुळे काही औषधांवर परिणाम होऊ शकतो, म्हणून जागा बदलणे चांगले.
स्वयंपाकघरातील उष्णता, वाफ आणि आर्द्रता औषधांसाठी योग्य नसते. औषधांसाठी थंड आणि कोरडी जागा निवडा.
खिडकीतून येणारा थेट सूर्यप्रकाश आणि उष्णता औषधांचे तापमान बदलू शकते. त्यामुळे औषधे सावलीच्या जागी ठेवा.
बेडजवळ औषधे ठेवणे सोयीचे वाटते, पण लहान मुलांच्या सहज हाताला ती लागू शकतात.
कारच्या आत तापमान झपाट्याने वाढू शकते. अशा उष्णतेमुळे काही औषधांची गुणवत्ता आणि परिणामकारकता कमी होऊ शकते.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा