Ruchika Jadhav
'ध्वजारोहण' आणि 'ध्वजवंदन' या दोन शब्दांमध्ये अनेक व्यक्तींना कंफ्युजन आहे.
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन 'ध्वजारोहण' केले जाते.
ध्वाजारोहण म्हणजे झेंड्याला दोरीद्वारे खालून वर घेऊन जाणे आणि मग झेंडा उघडून फडकवणे होय.
देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरून 'ध्वजारोहण' करतात.
स्वातंत्र्य दिनी भारतीय संविधान लागू झाले नव्हते त्यामुळे राष्ट्रपतींंनी आपला पदभार स्विकारला नव्हता त्यामुळे पंतप्रधान 'ध्वजारोहण' करतात.
२६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी 'ध्वजवंदन' करतात.
प्रजासत्ताक दिनी झेंडा वरच बांधलेला असतो. दोरीद्वारे नंतर तो उघडून फडकवला जातो. त्यामुळे त्याला 'ध्वजवंदन' म्हणतात.
प्रजासत्ताक दिनावेळी संविधान लागू झाले होते, त्यामुळे राष्ट्रपती राजपथ येथे झेंडा फडकवतात.