GK: भारतातील एकमेव गाव जिथे वर्षभर पडतो पाऊस, निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण म्हणजे स्वर्गच!

Dhanshri Shintre

मुसळधार पाऊस

आज आपण अशा खास ठिकाणाची माहिती घेणार आहोत जिथे वर्षभर न थांबता मुसळधार पाऊस पडतो.

निसर्गसौंदर्याने नटलेले

हे गाव अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेले आहे, जिथे तुम्ही एक सुंदर पर्यटनाचा अनुभव घेण्यासाठी भेट देऊ शकता.

मावसिनराम गाव

मेघालयात वसलेले मावसिनराम हे गाव सतत पडणाऱ्या पावसामुळे प्रसिद्ध असून ते अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य आहे.

किती पाऊस पडतो?

मावसिनराम या गावात दरवर्षी सरासरी ११,८७१ मिमी इतका पाऊस पडतो, त्यामुळे ते जगात सर्वाधिक पावसाचे ठिकाण मानले जाते.

बांबूपासून तयार केलेल्या छत्र्या

मावसिनराममधील रहिवासी सततच्या पावसापासून बचावासाठी बांबूपासून तयार केलेल्या छत्र्या आणि टोपल्यांचा वापर करतात.

मनमोहक दृश्य

या ठिकाणी तुम्हाला निसर्गाचे अद्वितीय सौंदर्य, धबधबे, हिरवाई आणि धुके यांचे मनमोहक दृश्य अनुभवता येतील.

मावसिनराम

मेघालयमध्ये प्रवासाची योजना करत असाल, तर मावसिनराम हे ठिकाण नक्कीच तुमच्या यादीत समाविष्ट असायला हवं.

NEXT: जगातील सर्वात स्वस्त सोने कोणत्या देशात आहे?

येथे क्लिक करा