Dhule Tourism: माथेरान-महाबळेश्वर पडेल फिकं! धुळ्यापासून दूर १५० किमी दूर असलेल्या या हिल स्टेशनला नक्की फिरून या

Surabhi Jayashree Jagdish

धुळ्याजवळचं हिल स्टेशन

धुळे जिल्ह्याच्या आसपास पावसाळ्यात निसर्गाचा मनमुराद आनंद घ्यायचा असेल तर एक उत्तम हिल स्टेशन मानलं जातं. सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेले हे ठिकाण हिरवाई, धबधबे आणि ढगांनी वेढलेल्या निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.

Dhule Tourist Places | saam tv

हिल स्टेशन

तोरणमाळ हे महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात वसलेलं एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. हे सातपुडा पर्वतरांगांच्या उंच भागात सुमारे 1,150 मीटर उंचीवर वसलेले आहे. महाराष्ट्रातील थंड आणि निसर्गरम्य हिल स्टेशनपैकी ते एक मानले जाते.

Monsoon Destination Maharashtra | saam tv

धुळ्यापासून किती अंतर आहे?

धुळे शहरापासून तोरणमाळ सुमारे 150 ते 160 किलोमीटर अंतरावर आहे. रस्त्याच्या स्थितीनुसार हा प्रवास साधारण 4 ते 5 तासांत पूर्ण होऊ शकतो. धुळे–शहादा–प्रकाशा–अक्कलकुवा मार्गे याठिकाणी सहज पोहोचता येतं.

Hill Station Near Dhule | saam tv

पावसाळ्यात तोरणमाळचे सौंदर्य

पावसाळ्यात संपूर्ण तोरणमाळ परिसर हिरव्या गालिच्याने झाकल्यासारखा दिसतो. डोंगरांवरून वाहणारे लहान-मोठे धबधबे आणि दाट धुके पर्यटकांना आकर्षित करते. ढग अक्षरशः रस्त्यांवर उतरल्याचा अनुभव याठिकाणी मिळतो.

Satpura Hills | saam tv

प्रमुख ठिकाणं कोणती

तोरणमाळमध्ये यशवंत तलाव, सीताखाई पॉइंट, खडकी पॉइंट आणि गोरक्षनाथ मंदिर ही प्रमुख ठिकाणं आहेत. यशवंत तलावाच्या परिसरात शांत वातावरणात फिरण्याचा वेगळाच आनंद मिळतो. विविध व्ह्यू पॉइंटवरून सातपुडा पर्वतरांगांचे भव्य दृश्य पाहता येतं.

Toranmal Travel Guide | saam tv

पावसाळ्यात फोटोग्राफी

पावसाळ्यात याठिकाणी असंख्य नैसर्गिक फ्रेम्स तयार होतात त्यामुळे फोटोग्राफीसाठी हे ठिकाण आदर्श मानले जाते. सूर्योदय, धुक्यात हरवलेले डोंगर आणि हिरवीगार दऱ्या कॅमेऱ्यात टिपण्यासारख्या असतात.

Weekend Getaway Maharashtra | saam tv

कमी गर्दी

तोरणमाळमध्ये गर्दी तुलनेने कमी असल्यामुळे निवांत सहलीचा आनंद घेता येतो. कुटुंबासोबत तलाव परिसरात फिरणं, निसर्गदृश्यांचा आनंद घेणं या बाबी तुम्ही करू शकता. मित्रांसोबत रोड ट्रिपसाठीही हा मार्ग अतिशय सुंदर आणि संस्मरणीय ठरतो.

Family Trip Destination | saam tv

Heart attack: हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीराच्या या ३ भागांत होतात वेदना

heart health tips | saam tv
येथे क्लिक करा