Shreya Maskar
तुम्हाला थंडीत काही चटपटीत खावेसे वाटत असेल तर मटर पराठा बनवा. टिफिन आणि नाश्त्यासाठी ही परफेक्ट डिश आहे.
मटर पराठा बनवण्यासाठी मटर, लसूण, मिरची, कांदा, आलं, तांदळाचे पीठ, बेसन, गव्हाचे पीठ, ओवा, जिरे, मसाले, तूप, मीठ, तेल इत्यादी साहित्य लागते.
मटर पराठा बनवण्यासाठी पॅनमध्ये तेल टाकून जिरे, लसूण, मिरची, आल्याची पेस्ट मिक्स करा. त्यानंतर मटर शिजवून मॅश करा. मॅश मटारमुळे पराठ्यातून सारण बाहेर येणार नाही.
आता यात बारीक चिरलेला कांदा, मसाला, मीठ घालून मिक्स करा. तुम्ही यात आवडेल ते पदार्थ देखील टाकू शकता.
एका परातीत गव्हाचे पीठ, बेसन, तांदळाचे पीठ , तेल, मीठ घालून कणिक मळून घ्या. कणिक मळल्यावर 10 मिनिटे पीठ बाजूला ठेवा.
मळलेल्या पीठाचे छोटे गोळे करून त्यात तयार सारण भरा आणि गोल चपाती लाटा. तुम्ही मैद्याच्या कोरड्या पिठाचा वापर करा. जेणेकरून पराठा फाटणार नाही.
पॅनला तूप गरम करून त्यात मटार पराठे दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या. गॅस मध्यम आचेवर ठेवा. हा पदार्थ तुमच्या लहान मुलांना खूप आवडेल.
गरमागरम मटर पराठ्याचा पुदिन्याच्या चटणीसोबत आस्वाद घ्या. चहासोबतही पराठा खूपच मस्त लागेल.