Shreya Maskar
हिवाळ्यात जेवताना काही चटपटीत खावेसे वाटत असेल तर दही मिरची एकदा ट्राय करा. गावाकडे हा पदार्थ कायम बनवला जातो.
दही मिरची बनवण्यासाठी धणे, बडीशेप, मेथी दाणे, जिरे, हिरव्या मिरच्या, हिंग, दही, काळे मीठ, ओवा, आमचूर पावडर इत्यादी साहित्य लागते.
दही मिरची बनवण्यासाठी धणे, बडीशेप, मेथी दाणे, जिरे, ओवा इत्यादी पदार्थ थोड्या तेलात भाजून घ्या.
त्यानंतर सर्व मिश्रण मिक्सरमध्ये वाटून त्याची बारीक पावडर करा. त्यानंतर ही पावडर एका बाऊलमध्ये काढून त्यात हिंग, काळे मीठ, ओवा, आमचूर पावडर घालून मिक्स करा.
शेवटी यात घट्ट दही मिक्स करा. चमच्याने हा सगळा मसाला व्यवस्थित एकजीव करून घ्यावा. पेस्टमध्ये गुठळ्या राहणार नाही याची काळजी घ्या.
तयार मसाला कापून घेतलेल्या मिरच्यांमध्ये भरून घ्यावा. या मिरच्या दोन ते तीन दिवस ऊन्हात, पंख्याखाली वाळवा. त्यातील ओलावा सुखवा.
वाळवून घेतलेल्या मिरच्या एका एअर टाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवा, जेणेकरून त्या जास्त काळ टिकतील. तसेच त्यांना सर्व मसाला देखील लागले.
दही मिरची जेव्हा खायची असेल तेव्हा तेलात खरपूस तळून त्याचा आस्वाद घ्या. तुम्ही 6-7 दिवस यांचा आस्वाद घेऊ शकता.