Siddhi Hande
प्रत्येकाला चटपटीत फास्ट फूड पदार्थ आवडतात. तुम्ही बाहेर जाऊन नेहमी कचोरी खात असाल.
परंतु आता तुम्ही घरीच हिरव्या वाटाण्याची मटार कचोरी ट्राय करु शकता.
हिरवे वाटाणे, तेल, मसाले बेसन, इतर पीठ, तूप, मैदा
सर्वात आधी तुम्हाला वाटाणे सोलून वाफवून घ्यायचे आहे. यानंतर ते मॅश करा. यात थोडं तेल टाका.
यानंतर फोडणीसाठी कढईत थोड तेल टाका.त्यात मसाले टाकावे. यानंतर मटारचे सारण परतून घ्या.
मटारच्या सारणात तुम्ही थोडे भाजलेले बेसन टाका. जेणेकरुन मटारातील पाणी पूर्णपणे शोषून घेतले जाईल.
यानंतर एका बाजूला मैदा घ्या. मैद्यात थोडं तूप किंवा तेल टाका. त्यात थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्या.
हे मिश्रण तुम्ही १५ मिनिटे बाजूला ठेवा. जेणेकरुन कचोरी खुसखुशीत होतील.
यानंतर या पीठाचे गोल पुऱ्या लाटा. त्यात मध्ये मटारचे सारण भरा. आणि वरुन पॅक करुन घ्या.
यानंतर तेल कडकडीत तापल्यावर कचोरी सोडून तळून घ्या.