Shreya Maskar
बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखचा 'मस्ती 4' चित्रपट 21 नोव्हेंबरला रिलीज झाला आहे. 'मस्ती 4' हा चित्रपट कॉमेडी ड्रामा आहे.
'मस्ती 4' हा 'मस्ती' फ्रेंचायझीचा चौथा भाग आहे. या चित्रपटात अनेक हटके, प्रसिद्ध कलाकार पाहायला मिळत आहेत.
'मस्ती 4' चित्रपटात रितेश देशमुखसोबत विवेक ओबेरॉय, अरशद वारसी, आफताब शिवदासानी, तुषार कपूर, नरगिस फाखरी, एलनाज नौरोजी , श्रेया शर्मा हे झळकले आहेत.
'मस्ती 4' सोबत एकाच दिवशी फरहान अख्तरचा '120 बहादूर' चित्रपट रिलाीज झाला आहे. जो 'मस्ती 4'ला तगडी टक्कर देत आहेत.
Sacnilk च्या रिपोर्टनुसारनुसार, 'मस्ती 4' चित्रपटाने पहिल्या रविवारी 3.00 कोटी रुपये कमावले आहे. चित्रपटीचे एकूण कलेक्शन 8.50 कोटी रुपये झाले आहे. 'मस्ती 4' चित्रपट मिलाप झावेरी यांनी दिग्दर्शित केला आहे.
'मस्ती 4' चित्रपट थिएटर रिलीजनंतर ओटीटीवर पाहता येणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'मस्ती 4' ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
'मस्ती 4'ची ओटीटी रिलीज डेट अद्याप जाहीर झाली नाही आहे. मात्र असे बोले जात आहे की, थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर सहा ते आठ आठवड्यांनी चित्रपट ओटीटीवर पाहता येईल. तसेच तो जानेवारीमध्ये देखील ओटीटीवर येऊ शकतो.
'मस्ती 4' चित्रपटातील गाणी सोशल मीडियावर ट्रेडिंगवर पाहायला मिळत आहे. तसेच कलाकारांचा अभिनय देखील प्रेक्षकांना खूप आवडला आहे.