Shreya Maskar
मसूर भात बनवण्यासाठी मसूर डाळ, तांदूळ, कांदा, टोमॅटो, आलं-लसूण पेस्ट, खडे मसाले, तूप आणि तेल इत्यादी साहित्य लागते.
मसूर भात बनवण्यासाठी सर्वप्रथम मसूर डाळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये शिजवून घ्या.
पॅनमध्ये तेल टाकून सर्व खडे मसाले त्यात परतून घ्या. (तमालपत्र, दालचिनी, लवंग, काळी मिरी)
यात बारीक चिरलेला कांदा गोल्डन फ्राय करा.
त्यानंतर आलं-लसूण पेस्ट, टोमॅटो घालून परतून घ्या.
शेवटी यात तांदूळ आणि शिजवलेली मसूर डाळ घालून मिक्स करा.
चवीनुसार मीठ घालून भात शिजवून घ्या.
तुम्ही यात मटार, बटाटे किंवा इतर आवडीच्या भाज्या देखील टाकू शकता.