Shruti Vilas Kadam
मसूर डाळ ही प्रोटीनचा उत्तम स्रोत मानली जाते. शाकाहारी लोकांसाठी ती विशेष फायदेशीर असून स्नायू मजबूत ठेवण्यास मदत करते.
मसूर डाळीत फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या कमी होण्यास मदत मिळते.
ही डाळ खाल्ल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते. त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
मसूर डाळ कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करू शकते. त्यामुळे हृदय निरोगी राहण्यास आणि रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत मिळते.
मसूर डाळीत आयर्न आणि इतर पोषक घटक असतात. त्यामुळे शरीरातील अशक्तपणा कमी होऊन एनर्जी टिकून राहते.
मसूर डाळीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत मिळू शकते.
मसूर डाळीत असलेले व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. तसेच केस मजबूत आणि चमकदार राहण्यासही फायदा होतो.