Siddhi Hande
रोज जेवणाला काय बनवायचा असा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो. तुम्ही झटपट होणार मसूरची आमटी बनवू शकतात.
मसूरची आमटी ही खूप चविष्ट असते. त्याचसोबत आमटी बनवायला फार वेळ लागत नाही.
अख्खे मसूर, तेल, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टॉमेटो, आलं-लसूण पेस्ट, मोहरी, हिंग, जिरं, कढीपत्ता, हळद, लाल तिखट, गोडा मसाला, धने पावडर, मीठ, कोथिंबीर
सर्वात आधी तुम्हाला भिजवलेले मसूर कुकरमध्ये टाका.दोन ते तीन शिट्ट्या घ्या.
यानंतर फोडणीसाठी तेल गरम करा. त्यात जिरं मोहरी, कढीपत्त्याची फोडणी द्या.
यामध्ये बारीक टिरलेला कांदा परतून घ्या. त्यात आलं-लसूण पेस्ट आणि टॉमेटो घालून छान शिजवा.
यानंतर लाल तिखट, हळद आणि गरम मसाला टाका. तेल सुटेपर्यंत परता.
यानंतर शिजवलेले मसूर यात टाका. गरम पाणी टाका. यानंतर तुमच्या आवश्यकतेनुसार पाणी टाका.
मसूरवर झाकण ठेवून १०-१२ मिनिटे उकळून घ्या. यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.