Manasvi Choudhary
सकाळी नाश्त्याला नेमकं काय बनवावे असा प्रश्न महिलांना दररोज पडत असतो यासाठी आज आम्ही तुम्हाला एक रेसिपी सांगणार आहोत ती म्हणजे दहीतले पोहे.
उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळण्यासाठी दह्याचे सेवन केले जाते यासाठी तुम्ही नाश्त्याला दहीतले पोहे ही रेसिपी ट्राय करा.
दह्यातले पोहे ही घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही सहज बनवू शकता.
दही पोहे रेसिपी बनवण्यासाठी पोहे, दही, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे, कढीपत्ता, शेंगदाणे, तूप, साखर आणि मीठ हे साहित्य एकत्र करा.
सर्वातआधी पोहे पाण्यात भिजवून घ्या. एका भांड्यामध्ये दही चांगलं फेटून घ्या. नंतर दहीमध्ये पोहे मिक्स करा आणि त्यात मीठ आणि साखर घाला.
ं
सर्वातआधी पोहे पाण्यात भिजवून घ्या. एका भांड्यामध्ये दही चांगलं फेटून घ्या. नंतर दहीमध्ये पोहे मिक्स करा आणि त्यात मीठ आणि साखर घाला.
गॅसवर कढईमध्ये तूपामध्ये जिरे, मोहरी आणि हळद याची फोडणी द्या फोडणी तडतडली की त्यात हिरवी मिरची, शेंगदाणे आणि कढीपत्ता मिक्स करून मिश्रण चांगले परतून घ्या.
आता या तुपाच्या फोडणीमध्ये दही घालून भिजवलेले पोहे मिक्स करा आणि संपूर्ण मिश्रण एकजीव करून घ्या.
अशाप्रकारे दही पोहे तयार झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून दही पोहे सर्व्ह करा.