Masala Dosa Recipe: नाश्त्यासाठी घरीच बनवा हॉटेलस्टाईल कुरकुरीत मसाला डोसा, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य

डोश्याचे पीठ, उकडलेले बटाटे, कांदा, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, मोहरी, हळद, चणाडाळ, उडीद डाळ, तेल, मीठ आणि कोथिंबीर तयार ठेवा.

Masala Dosa Recipe | Social media

बटाट्याचा मसाला तयार करा

कढईत तेल गरम करून मोहरी, चणाडाळ, उडीद डाळ, कढीपत्ता आणि हिरव्या मिरचीची फोडणी द्या. त्यात कांदा परतून हळद, मीठ आणि कुस्करलेले बटाटे घालून मिश्रण चांगले एकजीव करा. शेवटी कोथिंबीर घाला.

Masala Dosa Recipe | Social media

तवा गरम करा

नॉन-स्टिक किंवा लोखंडी तवा चांगला गरम करा. तवा जास्त गरम झाल्यास त्यावर थोडे पाणी शिंपडून स्वच्छ कापडाने पुसून घ्या.

Masala Dosa Recipe | Social media

डोसा पसरवा

तव्यावर एक डाव डोश्याचे पीठ घालून गोलाकार आणि पातळ पसरवा. कडा आणि वरच्या बाजूला थोडे तेल किंवा तूप सोडा.

Masala Dosa Recipe | Social media

मसाला भरा

डोसा कुरकुरीत झाल्यावर मध्यभागी तयार केलेला बटाट्याचा मसाला ठेवा आणि डोसा अर्धा किंवा त्रिकोणी घडी करून बंद करा.

Masala Dosa Recipe | Social media

चटणी आणि सांबारसोबत सर्व्ह करा

गरमागरम मसाला डोसा नारळाची चटणी, टोमॅटो चटणी आणि सांबारसोबत सर्व्ह करा. त्यामुळे चव अधिक वाढते.

Masala Dosa | Social media

परफेक्ट डोशासाठी टिप्स

डोश्याचे पीठ योग्यरीत्या आंबलेले असावे. तवा योग्य तापमानाचा असणे आणि डोसा पातळ पसरवणे हे कुरकुरीत डोसा बनवण्याचे महत्त्वाचे रहस्य आहे.

Masala Dosa

Angoori Rasmalai Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट बनवा स्वादिष्ट अंगुरी रसमलाई रेसिपी

Angoori Rasmalai Recipe | AI
येथे क्लिक करा