Siddhi Hande
तांदूळ,पाणी, हिरव्या मिरच्या, मीठ, हळद, तेल, वाटाणे, शेंगदाणे, आलं-लसूण पेस्ट, कोथिंबीर, काळी मिरी, लवंग, तमालपत्र
सर्वात आधी तुम्हाला तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. तांदळातील पाणी सर्व काढून घ्या.
यानंतर कुकरमध्ये तेल गरम करा. त्यात मोहरी टाका. मोहरी छान तडतडू द्या.
यानंतर तेलात आलं-लसूण पेस्ट टाका. कढीपत्ता टाकून परतून घ्या.
यानंतर फोडणीत वाटाणे आणि शेंगदाणे आणि वाटाणे टाका. यानंतर फोडणीच हिरव्या मिरच्या आणि हळद टाका.
तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही घरचा लाल मसाला, तिखट घालू शकतात किंवा फक्त हिरव्या मिरचीचा मसाले भात बनवू शकतात.
यानंतर यामध्ये धुतलेले तांदूळ घाला. हे तांदूळ छान परतून घ्या. यामध्ये लवंग, काळी मिरी आणि तमालपत्र घाला.
या मिश्रणात मीठ घालून सर्व एकजीव करुन घ्या. तांदूळ कुकरला चिटकू नये.
फोडणीचा छान सुगंध सुटला की त्यात चार वाट्या गरम पाणी टाका.
यानंतर आता कुकरचे झाकण बंद करुन शिट्ट्या घ्या. ३-४ शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करा. यानंतर थोड्या वेळाने कुकर उघडा.
यानंतर भातावर छान चिरलेली कोथिंबीर, ओलं खोबरं टाकून खाऊ शकतात.