Shreya Maskar
मुंबईतील मालाडच्या पश्चिम उपनगरात मार्वे बीच वसलेला आहे. हे ठिकाण शहरातील गजबजाटापासून दूर, शांत आणि नयनरम्य समुद्रकिनाऱ्यामुळे लोकप्रिय आहे.
मार्वे बीचच्या आजूबाजूला हिरवीगार झाडी, थंड वातावरण पाहायला मिळते. वीकेंडला फिरायला हे मुंबईतील बेस्ट लोकेशन आहे.
मार्वे बीचच्या जवळ ग्लोबल विपश्यना पॅगोडा, गोराई बीच आणि एस्सेलवर्ल्ड यांसारखी पर्यटन स्थळे आहेत.
मार्वे बीचवरून सूर्योदय आणि सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. तुम्ही येथे भन्नाट फोटोशूट करू शकता. वीकेंडला येथे गर्दी पाहायला मिळते.
मार्वे बीचजवळ खाण्यापिण्याची आणि राहण्याची उत्तम सोय उपलब्ध आहे. येथे अनेक हॉटेल्स, रिसॉर्ट्स आहे.
मालाड स्टेशनला उतरून तुम्ही पुढे रिक्षाने मार्वे बीचला पोहचाल.
मार्वे बीचवर जलक्रीडांचा आनंद घेता येतो. तसेच घोडेस्वारी करताना पर्यटक दिसतात. वाळूमध्ये खेळ खेळले जातात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.