Ruchika Jadhav
प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात लग्नाचं स्वप्न पाहत असतो.
आपल्या लग्नामध्ये एकच नवरी सर्वांपेक्षा जास्त नटते आणि सुंदरही दिसते.
प्रत्येक नवरीची आपल्या लग्नासाठी काही वेगवेगळी स्वप्ने असतात.
मात्र काही घरांमध्ये मुलींची संख्या जास्त असल्यास एकाच मांडवात दोन बहिणींचे लग्न लावून दिले जाते.
पाहुणचार आणि जेवणाचा खर्च वाचावा यासाठी एकाचवेळी दोन लग्न लावली जातात.
मात्र असे करणे हिंदू संस्कृतीनुसार अशुभ मानले जाते, असं काही अभ्यासक मंडळी सांगतात.
एकाच मांडवात लग्न केल्यावर यातील एका बहिणीचं चांगलं आणि एका बहिणीचं वाईट होणार असं म्हटलं जातं.
खरंतर प्रत्येक मुलीला आपल्या लग्नात आपण सर्वात जास्त स्पेशल असावं असं वाटतं. त्यामुळे प्रथा परंपरांव्यतीरीक्त मुलींच्या आनंदासाठी एकाच मांडवात दोन लग्न करणे टाळावे.
टीप: वरील माहिती सामान्य असून साम टीव्ही याचे समर्थन करत नाही.