Manasvi Choudhary
हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्व असते. आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरूवार आहे.
मार्गशीर्ष महिना धन समृ्द्धीची देवी महालक्ष्मीला समर्पित आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरूवारी महालक्ष्मीची पूजा केल्याने सुख- समृ्द्धी प्राप्त होते.
मार्गशीर्ष महिन्यात गुरूवारी सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ वस्त्र परिधान करा. पूजा करण्यासाठी चौरंग ठेवून त्यावर लाल वस्त्र टाका.चौरंगाच्या बाजूला रांगोळी काढा.
चौरंगावर महालक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवा त्यानंतर, ताब्यांच्या कलश घ्या त्यात एक रूपयाचे नाणे टाका. कलशाला हळकुंकू लावा आणि त्यावर नारळ ठेवावा. तुम्ही या नारळाला सजवून देवीचे रूप देखील करू शकता.
चौरंगावर पाच फळे, विड्याची पाने आणि देवीचा श्रृगांर ठेवा. यानंतर महालक्ष्मी व्रत कथा पुस्त ठेवून त्याची पूजा करावी. देवीला हळदकुंकू लावा. हार आणि फुलांची वेणी घाला.
मार्गशीर्ष महिन्यात यंदा चार गुरूवार आहे. प्रत्येक गुरूवारी तुम्ही अश्याप्रकारे पूजेची विधिवत मांडणी करू शकता.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.