Chetan Bodke
‘दिल दोस्ती दुनियादारी’ फेम स्वानंदी टिकेकरने जुलै २०२३ मध्ये इन्स्टाग्रामवर प्रेमाची कबुली दिली.
स्वानंदीने प्रेमाची कबुली दिल्यानंतर बॉयफ्रेंड आशिष कुलकर्णीसोबत त्यांनी साखरपुडा केला.
स्वानंदी अभिनय क्षेत्रात माहीर असून ती गायनातही अव्वल आहे. तसेच तिचा बॉयफ्रेंड आशिष कुलकर्णी सुद्धा गायक आहे.
स्वानंदी नेहमीच सोशल मीडियावर वेगवेगळ्या अंदाजातले फोटो चाहत्यांसोबत शेअर करते.
नुकतंच अभिनेत्रीने काही खास अंदाजातले फोटो शेअर केले आहे.
कॉफी कलरचा टी- शर्ट आणि जिन्समध्ये हटक्या अंदाजात अभिनेत्रीने फोटोशूट केलं आहे.
मोकळे केस आणि नो मेकअप असा वेगळा अंदाज तिने केला आहे.
स्वानंदी टिकेकर ‘अगं अगं सुनबाई, काय म्हणता सासूबाई’ या मालिकेमुळे प्रचंड चर्चेत आली होती.